

श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था
श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था ही एक सामाजिक विकासाकरिता काम करणारी संस्था आहे. देणगी आणि सेवा अशा लोकसहभागातून ही संस्था आपले कार्य करीत आहे. २०१६ साली या संस्थेची स्थापना झाली. वृद्धाश्रम, गौशाला, छात्रावास आणि शाळा हे चार प्रकल्प म्हणजे संस्थेचे चार स्तंभ आहेत व वैद्यकीय सेवा केंद्र, हे यावरील छत्र आहे.
सध्या साई सावली वृद्धाश्रम तसेच गौसाई ही गोशाळा अशा दोन प्रकल्पांचे संचालन आणि नियोजन आम्ही यशस्वीपणे करीत आहोत.
‘सामाजिक सेवामहे’ हे ब्रीदवाक्य उच्चारून समाजातील तळागळातील घटकांच्या उत्थानाकरिता संस्था आणि संस्थेच्या माध्यमाने आम्ही कार्यकर्ते हे समाजाप्रति असलेल्या आपल्या दायित्वाची जाणीव ठेवून आहोत. आमच्या या कार्यात आपला सहभाग किंवा देणगीरूपी योगदान प्राप्त व्हावे ही नम्र अपेक्षा आहे.
संस्थेचे व्हिजन
समाजातील तळागळातील व्यक्तींना उत्तम आरोग्य व जीवन लाभावे या करिता श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था तत्पर आहे. या दिशेने ही संस्था सेवा, सुश् रुषा, व सहजीवन यासाठी कार्यरत असेल आणि एक सुदृढ समाज घडविण्यासाठी व्रतस्थ असेल.
संस्थेचे मिशन
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, युवा, कृषी आणि धर्मार्थ या क्षेत्रात धर्मदाय माध्यमाने आणि लोकसहभागातून वृद्धाश्रम, गौशाला, छात्रावास, रुग्णालय, आणि शाळा,असे विविध प्रकल्प उभारून त्याद्वारे विविध उपक्रम घेऊन संस्थेचे उद्देश्य गाठण्यासाठी झटणे व समाज आणि संस्था यांच्याशी प्रामाणिक राहून सेवाभावाने कार्य करून सामाजिक उन्नती घडवून आणणे हे संस्थेचे मिशन आहे.
संस्थेचे प्रमुख पदाधिकारी

डॉ. विनोद केळझरकर
अध्यक्ष
श्री. विनोद हे व्यवसायाने डॉक्टर असून मितभाषी आणि हळव्या मनाचे व्यक्ती आहेत. त्यांना जेव्हा जेव्हा आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजात असणारे असहाय्य, एकटेपणाने निराश झालेले वृद्ध दिसतात, तेव्हा ‘हे वृद्ध दुःखी आहेत तर आपण आनंदी कसे राहू शकतो?’ हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो. याच भावनेतून त्यांनी वृद्धाश्रमाची कल्पना सुचली आणि त्यासाठी श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्था स्थापन केली.
सामाजिक कार्याची अत्यंत आवड आणि सेवा, सुश्रुषा करण्यात रुची असलेले डॉ. विनोद केळझरकर हे एक नम्र नेतृत्व आहे. संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.

सौ. विशाखा मोहोड
सचिव
विशाखा ह्या सर्वप्रथम एक उत्तम गृहिणी आहेत. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यातील नेतृत्वाचे गुण दिसू लागलेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचे हक्क आणि त्यांना न्याय मिळावा याकरिता अनेक आंदोलने आणि चळवळींचे त्यांनी नेतृत्व केले. सामाजिक बांधिलकी आणि दायित्व याचे भान ठेऊनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नागपूर महानगर पालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्या निरंतर प्रभाग विकासाच्या प्रयत्नात असतात. विशाखा ह्या अनेक संस्थांच्या कार्यकारिणी सदस्या आहेत. श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत.

श्री. रवींद्र गीते
कोषाध्यक्ष
शिक्षक हा समाज घडविणारी एक संस्थाच असते आणि रवींद्र हे एक असेच शिक्षक आहेत.
नागपुरातील नामांकित अशा हडस हायस्कुल येथे गणित या विषयाचे शिक्षक श्री. रवींद्र गीते यांना सामाजिक कार्याचे बाळकडू हे त्यांच्या वडिलांपासूनच प्राप्त झाले.
साई सावली वृद्धाश्रमच्या संकल्पनेत त्यांचे मोठे योगदान आहे.
गणित हा त्यांचा मूळ विषय आहे आणि समाजसेवेची त्यांना आवड आहे यामुळे संस्थेचे कोषाध्यक्ष म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत.

कार्यकारिणी सदस्य
श्री. उदय लाड - कापूस फेडरेशन व्यवस्थापक (माजी)
श्री. हेमंत डुमरे - व्यवस्थापक
श्री. नीलेश खुटाफले - प्राध्यापक
श्री. अनंत कदम - मुख्याध्यापक (माजी)
श्री. तीर्थराज बोबडे - व्यवसायिक
श्री. रवींद्र मिसाळ - वस्तू व सेवा कर अधिकारी
श्री. प्रवीण धोटे - उद्योजक
श्री. समीर हेजीब - शिक्षणतज्ज्ञ, कलावन्त.
श्री. आशीष केळझरकर - बँक उपव्यवस्थापक

.png)