
गौसाई गोशाळा
गाय ही जगाची माता आहे. वैदिक काळापासूनच गायीची पूजा केली जाते. गायीची पूजा ही केवळ भावनिक किंवा धार्मिक कारणांसाठी केली जात नाही; परंतु मानवी समाजाच्या आवश्यक गरजांमुळे केली जाते.
वेदांमध्ये गाईच्या उत्पादनांची चर्चा केली आहे. नंतरच्या काळात गाय ही कृषी, वाणिज्य आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आधारस्तंभ बनली. गाय हे तत्कालीन समाजात देवाणघेवाणीचे साधनही होते. गाईशिवाय निरोगी आणि समृद्ध राष्ट्राची कल्पना करणे अशक्य आहे; म्हणूनच संस्थेचा गौशाला आणि गौसेवा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.
गौसाई या प्रकल्पात सध्या पंधरा गोधन आहे आणि भविष्यात शंभर गोधनाचा संस्थेचा मानस आहे. यात गीर आणि गौळव प्रजातीच्याच गायी असाव्या असा निर्धार आहे. गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनाच्या विक्रीतून आलेला निधी यावर गौसाई गोशाळा आत्मनिर्भर बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. भविष्यात एकूण गोधनापैकी पन्नास टक्के या दूध देणाऱ्या तर पन्नास टक्के हे भाकड गुरे असतील.
गौसाई गोशाळेत आम्ही गायींना माणसाचे खाद्य देत नाही. गायीचे जे खाद्य आहे तेच पुरवितो आणि समाजालाही हाच संदेश देतो. चारा, कुटार, ढेप आणि वैद्यकीय सुश्रुषा असे खर्च याकरिता येतात. गौसेवेत आपणही आपला सहभाग नोंदवावा ही प्रार्थना आम्ही करीत आहोत.
.png)




